डिजिटल युगात वृत्तपत्राची सत्यता कायम

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांचे प्रतिपादन

नागपूर,
डिजिटल युगात एआयचा प्रवेश झाला असताना वृत्तपत्राला आता आवश्यकतेनुसार बदल स्विकारावा लागत आहे. डिजिटल माध्यमांकडून विविध बातम्यांचा भडीमार सुरू असताना वृत्तपत्राने आपली सत्यता कायम राखल्यामुळेच आज वृत्तपत्रांवर वाचकांचा विश्वास दिसून येतो, असे स्पष्ट प्रतिपादन अध्यक्ष महाराष्ट्र टाइम्सचे निवृत्त संपादक senior journalist Shripad Aparajit श्रीपाद अपराजित यांनी केले.
 
 
kalam
अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या वतीने श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे आयोजित परिसंवाद प्रसंगी ते बोलत होते. डिजिटल युगात वृत्तपत्रांची परिणामकारकता हा परिसंवादाचा विषय होता. यावेळी दैनिक तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे, लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे, आकाशवाणी वृत्तविभागाचे नम्रता फलके, टाइम्सचे पत्रकार मंदार मोरोणे, रेडियो ऑरेंजचे आरजे प्रीती,स्वाती सुरंगळीकर परिसंवादात सहभागी झाले होते.
 
वृत्तपत्राची परिणामकारकता कायम
डिजिटलच्या युगात बातम्यांची संख्या वाढली आहे. मात्र वृत्ताची सत्यता वर्तमानपत्रातच मिळत असल्याने आजच्या डिजिटल युगात वृत्तपत्राची परिणामकारकता कायम असल्याचे दिसून येते, असे स्पष्ट मत दैनिक तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे यांनी व्यक्त केले. पुढे म्हणाले, डिजिटल युगातही वृत्तपत्रे निवांतपणे वाचण्याची सवय अनेकांनी जपली आहे. प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रांचा खप सातत्याने वाढत असल्याने भविष्यातही वर्तमानपत्राचे स्थान कायम राहणार आहे.
 
 
बातम्यांवर वाचकांचा विश्वास
लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे परिसंवादात म्हणाले, वृत्तपत्रातील सत्यता कायम असल्यामुळेच बातम्यांवर वाचकांचा विश्वास आहे. डिजिटलच्या युगात वृत्तपत्राची परिणामकारकता कायम असताना डिजिटलच्या कोणताही आधार नसल्याचे दिसून येते. बदलत्या काळानुसार डिजिटलच्या युगात वृत्तपत्रातील अनेक पत्रकार डिजिटल मध्ये कार्यरत झाले आहे.
वृत्तपत्रात अनेक चांगले बदल
डिजिटलच्या युगात वृत्तपत्राने अनेक चांगले बदल करुन घेतले आहे. वृत्तपत्रात अचूक माहिती देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असल्यामुळेच सत्यता कायम राखण्यात यश मिळते. आजच्या स्पर्धेच्या युगात वृत्तपत्राने आपली वाचक कायम राखली आहे. यातून वृत्तपत्राची परिणामकारकता कायम असल्याचे दिसून येते, असे स्पष्ट मत आकाशवाणी वृत्तविभागाचे नम्रता फलके यांनी सांगितले.
वृत्तपत्राचे स्थान कायम
रेडियो ऑरेंजचे आरजे प्रीती यांनी सांगितले की, वृत्तपत्रात अनेक विषय असल्यामुळे वाचकांना पर्याय मिळतो. शहरातील युवावर्ग डिजिटलकडे वळला असला तरी सुध्दा निवांतक्षणी वृत्तपत्र वाचण्याचा आनंद काही वेगळाचा महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार मंदार मोरोणे यांनी सांगितले की, डिजिटल युग सुरु झाल्यानंतर वृत्तपत्रात खरी स्पर्धा दिसून येत आहे. एआयचा वापर होत असताना वृत्तपत्रातील पत्रकारांना अधिक काळजी घ्यावी लागते. नवनवीन तंत्रज्ञान आले तरी सुध्दा वृत्तपत्राचे स्थान कायम आहे. वृत्तपत्रात बातमी छापून आल्यानंतर कौतूक होत नाही मात्र विलंब झाल्यास विचारणा होते. युगातही वृत्तपत्राने आपले वाचक कायम राखले आहे.