नाफेडमार्फत पारवा येथे ज्वारी खरेदी सुरू करा

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
भारतीय किसान संघाची मागणी

पारवा, 
Start buying sorghum यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची पेरणी करण्यात आली. पारवा महसूल मडळ व कुर्ली महसूल मंडळ असून काही शेतकèयांची ज्वारी काढणी झाली आहे. नाफेडमार्फत घाटंजी तालुक्यात ज्वारी खरेदी सुरू न झाल्याने अनेक शेतकèयांची ज्वारी घरी पडून असल्याने नाफेडमार्फत ज्वारी खरेदी होणार की नाही या चिंतेत शेतकरी आहेत. खरीप हंगामात यंदा शेतकèयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
 
 
y25Apr-Kisaan
 
Start buying sorghum  यामुळे शेतकरी उन्हाळी ज्वारी पेरून कसेबसे कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी होईल, या आशेने ज्वारीची पेरणी केली. शासनाची ज्वारी खरेदी सुरु न झाल्याने शेतकèयांना माल कवडीमोल विकावा लागत आहे. प्रशासनाने तत्काळ ज्वारी खरेदी सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकारी, तहसीलदार व केळापूर-आर्णी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू तोडसाम यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली. या निवेदनावर मनोज यल्लमावार, किशोर लोकावार, अशोक येलपूलवार, महेश श्रीपदवार, अरविंद येल्टीवारसह अनेक शेतकèयांच्या स्वाक्षरी आहेत.