मारेगाव,
Suicide: Farmer Avinash Latari Panghate बँकेच्या कर्जाला कंटाळून गोरज येथील 42 वर्षीय शेतकरी अविनाश लटारी पानघाटे यांनी शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ही घटना उघडकीस आली. मृतकाचे मोठे बंधू पुरुषोत्तम लटारी पानघाटे (वय 59) यांच्या तक्रारीप्रमाणे, अविनाश यांच्या नावावर 3 एकर शेती होती. शेतीसाठी त्यांनी बँकेचे कर्ज घेतले होते. 23 एप्रिल रोजी संध्याकाळी कुटुंबीय लग्न समारंभ आटोपून गावी परतले. तेव्हा अविनाश घरी नसल्याने त्यांना फोन लावला. फोन न उचलल्याने पुरुषोत्तम व गावातील काही लोक शेतात शोधण्यास गेले.
Suicide: Farmer Avinash Latari Panghate वनोजादेवी शेतशिवारात उत्तम दादाजी पानघाटे यांच्या शेतात अविनाश पडलेले आढळले. त्यांच्या तोंडातून पांढरा फेस येत होता. विषारी औषध प्राशन केल्याचा संशय आल्याने तत्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. अविनाशच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पोलिस निरीक्षक श्याम वानखडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास दिगंबर किनाके करीत आहेत.