वर्धा,
Swarajya Yodha Cycling Challenge वर्धा सायकलिंग लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित स्वराज्य योद्धा सायकलिंग चॅलेंज सिझन २०२६ चा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या चॅलेंजमध्ये देशभरातील २६० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि सायकलिंगची आवड सर्वसामान्यांमध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वर्धा सायकलिंग लब सहा वर्षांपासून दररोज किमान २५ ते ३० किलोमीटर सायकल चालवून नागरिकांमध्ये फिटनेस आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.
Swarajya Yodha Cycling Challenge समारोप कार्यक्रमात वर्ध्यातील सहभागी स्पर्धकांना मेडल व टी-शर्टचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक मोहन गलांडे यांनी केले. यशस्वीतेकरिता वर्धा सायकलिंग लबचे अध्यक्ष किशोर वागदरकर, चॅलेंज हेड विजय मोहोड व राम चतुर यांच्यासह कुणाल तळवेकर, आमोद चौधरी, पियुष डेकाटे, प्रसाद सोईतकर, मोरेश्वर गोमासे, माधव झळके, अजय पेठे, नितीन भलमे, प्रवीण बदरे, हरीष हांडे, महेंद्र फाटे आलोक बेले आणि प्रफुल्ल पुणेवार यांनी परिश्रम घेतले.