‘तारक मेहता…’मध्ये बापूजींचा निरोप?

प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम आणि नाराजी

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
मुंबई
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या १८ वर्षांपासून प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करणाऱ्या या मालिकेत आता मोठं वळण येण्याची चिन्हे दिसत आहेत. मालिकेतील बापूजींची भूमिका साकारणारे अमित भट्ट हे शो सोडणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. या चर्चांना कारण ठरला आहे मालिकेचा नवा प्रोमो.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah latest promo, 
समोर आलेल्या प्रोमोमध्ये जेठालाल गोकुळधाम सोसायटीत अत्यंत अस्वस्थ अवस्थेत बापूजींचा शोध घेताना दिसतो. तो प्रत्येक घरात जाऊन चौकशी करतो, मात्र बापूजी कुठेच सापडत नाहीत. परिस्थिती अधिक गंभीर बनते कारण बापूजी आपला मोबाइल फोन घरीच ठेवून गेलेले असतात, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग उरत नाही. ही बातमी संपूर्ण सोसायटीत पसरताच सर्वजण चिंतेत पडतात.
प्रोमोमध्ये पुढे कथेला नाट्यमय वळण मिळते . जेठालाल एका व्यक्तीशी फोनवर बोलताना दिसतो आणि बापूजींबद्दल विचारतो. त्यावर समोरून रडत दिलेले उत्तर त्याला हादरवून टाकते – “बापूजी गेले, ते आम्हा सर्वांना सोडून गेले.” हे ऐकताच जेठालाल पूर्णपणे कोसळतो. या दृश्यामुळे मालिकेत खरोखरच बापूजींचे निधन दाखवणार का, की हा केवळ गैरसमज किंवा कथानकातील ट्विस्ट आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, या प्रोमोवर सोशल Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेक प्रेक्षकांनी या कथानकावर नाराजी व्यक्त केली आहे. “तीच तीच कथा किती वेळा दाखवणार?”, “काहीतरी नवीन दाखवा” अशा प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. काहींनी तर या ट्रॅकला “फारच निराशाजनक” असेही संबोधले आहे.याच पार्श्वभूमीवर अमित भट्ट मालिकेला रामराम ठोकणार असल्यानेच त्यांच्या पात्राचा शेवट दाखवला जाणार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मालिकेतील पुढील भाग प्रसारित झाल्यानंतरच या सगळ्या चर्चांना खरे-खोटे ठरणार आहे सध्या तरी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या आगामी भागांविषयी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.