मोबाईल अनलॉक 'अब उठेगा पडदेसे राज'

टीसीएस प्रकरणात मोठी कारवाई

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
नाशिक/मुंबई
tcs controversy आयटी क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीशी संबंधित कथित धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषणाच्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील एका आरोपीचा मोबाईल अखेर अनलॉक करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यातून महत्त्वाचा डिजिटल डेटा मिळवण्याचे काम सुरू आहे.
 

tcs controversy forced-conversion-harassment-allegations-case-update 
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने मोबाईलमधील विविध अ‍ॅप्स आणि फाईल्ससाठी स्वतंत्र पासवर्ड ठेवले होते. तसेच फेस आयडीसह अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा वापरल्यामुळे सुरुवातीला फॉरेन्सिक तपासणीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र न्यायालयाच्या विशेष परवानगीने आरोपीला फॉरेन्सिक लॅबमध्ये नेण्यात आले आणि त्यानंतर तांत्रिक प्रक्रियेद्वारे मोबाईल अनलॉक करण्यात आला.
 
 
मोबाईलमधून tcs controversy मिळालेल्या डेटाच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांचाही सहभाग असून, काही आरोपींना ट्रान्झिट वॉरंटद्वारे ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित व्यक्तींची वये साधारण ३० ते ३८ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येते.दरम्यान, या प्रकरणात जबरदस्ती धर्मांतरण, अमली पदार्थांचा वापर करून महिलांना जाळ्यात ओढणे आणि मानसिक तसेच लैंगिक छळ असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांकडून सर्व आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे.तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही डिजिटल पुरावे आणि ऑनलाइन संवादांचीही तपासणी केली जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचे इतर राज्यांतील काही घटनांशी कनेक्शन आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपांची अद्याप न्यायालयीन पडताळणी झालेली नाही. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य ठरणार नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.