शिलान्यास सोहळा ठरला प्रेरणादायी

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
नागपूर,
groundbreaking ceremony डॉ. आबाजी थत्ते सेवा व संशोधन संस्थेच्या वतीने जामठामधील नॅशनल कँसर इन्स्टिट्युट परिसरात शुक्रवारी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत तसेच संतांच्या उपस्थितीत झालेला भारत-दुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला. शिलान्यास व धर्मसभा अशा दोन भागात हा सोहळा झाला.
 
groundbreaking ceremony
ठीक ठरलेल्या मुहूर्तावर हा भव्य शिलान्यास सोहळा झाला. नॅशनल कँसर इन्स्टिट्युटच्या पूर्वेकडील जमिनीवर भव्य शामियाना उभारण्यात आला होता. सायंकाळी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, श्री जुना आखाडा पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, चिन्मय मिशनचे स्वामी मित्रानंद महाराज, बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री, साध्वी ऋतुंभरा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, खा. माया इवनाते, आ. प्रसाद लाड, आ. आशीष देशमुख, आ. चरणसिंह ठाकूर, महापौर नीता ठाकरे, डॉ. आबाजी थत्ते सेवा व संशोधन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील मनोहर, सचिव शैलेश जोगळेकर, अजय संचेती, डॉ. आनंद पाठक, आनंद औरंगाबादकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
सर्व संत व प्रमुख मान्यवरांसाठी खास आसन व्यवस्था होती. झांज व इतर पारंपरिक वाद्यांसह शंखनाद सुरू होता. प्रफुल्ल नंदनगिरी व इतर पुरोहित वेदमंत्रोच्चार करीत होते. प्रारंभी शैलेश जोगळेकर यांनी पूजा केल्यानंतर स्वतः सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गर्भगृहात उतरून भूमिपूजन केले. आरती झाली. तेथेच प्रस्तावितभारत-दुर्गा शक्तिस्थळाची प्रतिकृती होती. बाजूच्या भव्य शामियानात धर्मसभा झाली. मुख्य व्यासपीठालगतच दोन्हीकडे लहान व्यासपीठ उभारण्यात आले होते. एका व्यासपीठावर निवडक संत मंडळी होती. groundbreaking ceremony दुसऱ्या व्यासपीठावर खा. माया इवनाते, राज्यमंत्री पंकज भोयर, रा. स्व. संघाचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह अतुल लिमये, अ.भा. सहव्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे, पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर, विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचाललक राजेश लोया, पदमश्री डॉ. विलास डांगरे, पदमश्री सत्यनारायण नुवाल, दयाशंकर तिवारी उपस्थित होते.
 
 
सर्व संतांतर्फे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना भारत-दुर्गा मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली. groundbreaking ceremony या मंदिरात भारत मातेची मूर्ती कशा असावी, यासाठी निवडक चित्रकारांकडून चित्र मागविण्यात आले होते. त्यातून मूळचे नागपूरकर सुभाष बोकरे यांचे चित्र निवडण्यात आले. त्यांचा सत्कार करण्यात आला. हे मंदिर 12-14 फूट उंच, 4 फूट रुंद राहणार आहे. जयपूर येथे शुभ्र संगमरवरी मूर्ती साकारली जात आहे, असे शैलेश जोगळेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. आशुतोष अडोणी यांनी या भव्य धर्मसभा सोहळ्याचे संचालन केले.