वाघाच्या हल्ल्यात व्यक्ती ठार

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
देवदर्शन ठरले शेवटचे
 
चिमूर, 
tiger attack तालुक्यातील वाहनगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, 25 एप्रिल रोजी उघडकीस आली. शंकर दादाजी मसराम (48) असे मृतक इसमाचे नाव आहे. कुलदैवताच्या पूजेसाठी गेलेले शंकर मसराम हे रात्रीपर्यंत घरी परतले नाहीत. दुसर्‍या दिवशी त्यांच्या घरच्यांनी शोध घेतला असता शंकर मसराम यांचे रक्ताने माखलेले कपडे आढळून आले.
 
 
tiger att
 
tiger attack वनविभागाच्या पथकाने शोधमोहीम राबवून मंदिराजवळील परिसरातून त्यांचा मृतदेह हस्तगत केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सहाय्यक वनसंरक्षक साई दुबे यांनी नातेवाईकांची भेट घेऊन 50 हजारांची तातडीची मदत दिली. मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुली असून, घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.