‘विदर्भाची पंढरी’ पुसद येथे विठूरायाची चंदनउटी

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
पूजन सोहळा आणि गरजू जोडप्यांचा विवाह

पुसद, 
'Vidarbha's Pandhari' विदर्भाची पंढरी प्रतीपंढरपूर ज्ञानेश्वर संस्थान पुसद येथे पंढरपूर प्रमाणेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पांडुरंग-रुक्मिणी मातेला उटी पूजनाचा सोहळा साजरा करण्यात आला. उटी पूजनासाठी यजमान म्हणून पुसदचे डॉ. प्रणिता व डॉ. संतोष रेवणवार लाभले उपस्थित होते. कडक उन्हाळ्यात शीतलता, थंडावा हवा असतो, तद्वतच देवालाही उन्हामुळे उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी गुढीपाडव्यापासून उटीलेपन कार्यक्रम पंढरपूर प्रमाणे पुसद येथेही करण्यात आला.
 
 
y25Apr-Vivah
 
'Vidarbha's Pandhari'  या अनुषंगाने श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसदद्वारा होतकरू व गरजू महेश गादेवार आणि सीमा पारधे यांचा आंतरजातीय विवाह करून समाजासमोर एक आदर्श ठेवण्या आला आहे. या जोडप्याचा विवाह सोहळा संस्थानात पार पडला. यावेळी विष्णूसहस्रनाम हरीपाठ पठण करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष बिपीन चिद्दरवार यांनी पुढच्यावर्षी संस्थानतर्फे अशा प्रकारच्या गरजू होतकरू तरुण-तरुणींचा विवाह संस्थानतर्फे करून देण्यात येणार असल्याचा संकल्प केला आहे.