महिला आरक्षणाविरुद्ध मतदान करणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
झरीजामनी, 
Vote against women's reservation लोकसभेत महिला आरक्षणाविरुद्ध काँग्रेसकडून मतदान करण्यात आले. काँग्रेसच्या भूमिकेविरुद्ध झरी येथील वीर बिरसामुंडा चौकात शिवसेना (शिंदे) गटातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड यांच्या आदेशांनुसार महिला आरक्षण विधेयकावरून काँग्रेसविरोधात नप अध्यक्ष शीला चौधरी यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन पार पडले.
 

y25Apr-Zari-Nishedh 
 
Vote against women's reservation  काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे विधेयकाला अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, असा आरोप यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे असलेल्या या विधेयकाच्या संदर्भात विरोधी पक्षाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात शहराध्यक्ष शारदा गोस्कुलवार, सुनीता नखाते, नगरसेवक सुनीता डाखरे, नीता मांडवकर, तालुकाप्रमुख बाळू चेडे, विधानसभा समन्वयक चंद्रकांत घुगुल, शहरप्रमुख नाना सुगंधे, उपतालुकाप्रमुख अतुल निखाडे, विलास कसोटे, जीवन उलमाले, युवासेना तालुकाप्रमुख गोपाल मडावी, युवा सेना शहरप्रमुख शरद चौधरी, बंडू देवाडकर, प्रकाश जांभुळकर, युवा सेना समन्वयक राहुल ठाकूर, प्रमोद राऊत, संतोष शेळकी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.