जिल्ह्यातील १४ हजार महिला स्वयंसहायता समुहांना फिरता निधी

२१ कोटी १३ लाखांचे वितरण

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
वर्धा,
Wardha News उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान)च्यावतीने महिलांचे संघटन करून त्यांना रोजगारक्षम बनविण्यासोबतच उत्पन्नवाढीची विविध साधणे उपलब्ध करून दिली जातात. समुहातील महिलांना आपल्या छोट्या मोठ्या गरजा भागविण्यासाठी प्रती समूह ३० हजार याप्रमाणे फिरता निधी म्हणजे खेळते भांडवल उपलब्ध करून दिल्या जाते. गेल्यावर्षात १४ हजारांवर समुहांना २१ कोटींपेक्षा अधिक खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 
 
Wardha News
 
उमेदच्या वतीने महिलांचे मोठ्या प्रमाणावर गट तयार करण्यात आले आहे. गटाच्या माध्यमातून महिला विविध प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय, उद्योग करून आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत असल्याचे दिसत आहे. Wardha News या गटांना प्रोत्साहन देण्यासोबतच गटातील महिलांच्या छोट्या मोठ्या गरजा भागविण्यासाठी प्रती गट ३० हजार रुपयांचा फिरता निधी गटात उपलब्ध करून दिला जातो.
 
 
हा फिरता निधी गटातील महिला कर्ज स्वरुपात घेऊन आपल्या गरजा पूर्ण करतात. कालांतराने घेतलेले कर्ज महिला गटास परत करत असल्याने महिलांना कर्ज घेऊन परतफेडीची सवय लागते. शिवाय गटाला यावर व्याज मिळत असल्याने गटाच्या उत्पन्नात देखील वाढ होते. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३१ मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ४८३ स्वयंसहायता गटातील महिलांना प्रत्येकी ३० हजार रुपयांचा निधी पलब्ध करून देण्यात आला. Wardha News हा निधी २१ कोटी १३ लाख इतका आहे. त्यात आर्वी तालुयातील १८३० समुहांना २ कोटी ५८ लाख, आष्टी तालुका ११७३ समुहांना १ कोटी ७६ लाख, देवळी १६९८ समुहांना २ कोटी ५३ लाख, हिंगणघाट २०१० समुहांना २ कोटी ९६ लाख, कारंजा १२२७ समुहांना १ कोटी ७६ लाख, समुद्रपूर २०४९ समुहांना ३ कोटी ३ लाख, सेलू १६०२ समुहांना २ कोटी ३८ लाख तर वर्धा तालुयातील २८९४ समुहांना ४ कोटी १३ लाख रुपयांचा फिरता निधी देण्यात आला. या निधीतून समुहातील महिलांनी आपल्या आवश्यकतेप्रमाणे रकम कर्ज स्वरुपात प्राप्त करून आपल्या गरजांची पुर्तता केली आहे.
 
समुहांना ८६ कोटींचा समुदाय गुंतवणूक निधी
फिरत्या निधी सोबतच स्वयंसहायता गटांना समुदाय गुंतवणूक निधी देखील दिला जातो. हा निधी प्रत्येक समूह प्रत्येकी ६० हजार इतका दिला जातो. Wardha News गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील उमेद अभियानाच्या १४ हजार ३४७ समुहांना ८६ कोटी ८ लाख रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी देण्यात आला आहे.