देवळीत आरोग्य संपन्न गाव अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
एसएमडब्ल्यू इस्पाततर्फे कुटुंब आरोग्य कार्डांचे मोफत वितरण
 
देवळी, 
World Health Day जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानांतर्गत देवळी येथे कुटुंब आरोग्य कार्डांचे मोफत वितरण करण्यात आले. एसएमडब्ल्यू इस्पात प्रा.लि. देवळीच्या वतीने आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस होते तर प्रमुख अतिथी म्हणून आ. राजेश बकाणे उपस्थित होते. यावेळी नप उपाध्यक्ष राहुल चोपडा, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेडे, महालक्ष्मी युवाक्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद देशपांडे, तालुका आरोग्य अधीक्षक डॉ. आशिष लांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोनाली मामिलवार, ठाणेदार अमोल मंडाळकर, उपसरपंच आशिष कुचेवार, एसएमडब्ल्यू इस्पातचे संचालक दीपक सुमड, उपाध्यक्ष श्याम मुंदडा उपस्थित होते.
 
 
World Health Day
 
World Health Day  आ. राजेश बकाणे यांनी माझे गाव आरोग्य संपन्न गाव व्हायलाच पाहिजे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक आहे. समाजाप्रती असलेले दायित्व ओळखून कंपनीने आरोग्य कार्ड वितरणाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. कंपनीने प्रदूषणा वर ही लक्ष द्यावे असे ते म्हणाले. माजी खासदार रामदास तडस यांनी देवळी तालुयातील कबड्डी, कुस्ती व इतर खेळाडूंना कंपनीने सीएसआर निधीतून मदत करावी तसेच नगरपरिषदेच्या समन्वयातून शहर विकासात हातभार लावावा असे आवाहन केले. एसएमडब्ल्यू इस्पातचे उपाध्यक्ष श्याम मुंदडा म्हणाले की, कंपनीतर्फे दोन हजार आरोग्य कार्डांचे वितरण करण्यात येणार असून त्यापैकी एक हजार कार्ड कर्मचारी व एक हजार कार्ड परिसरातील गावांमध्ये दिली जाणार आहेत. गरज भासल्यास आणखी कार्डांची संख्या वाढविण्यात येईल. आरोग्य क्रीडा व शिक्षण क्षेत्रात कंपनी सातत्याने विविध सामाजिक कार्य करत असून पुढील पाच वर्षांत देवळी एमआयडीसीमध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमातून नागरिकांना कुटुंब आरोग्य कार्डांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. या कार्डांमुळे नियमित आरोग्य तपासणी वैद्यकीय सल्ला व उपचार सुविधा सुलभ होणार आहे. यशस्वीतेसाठी प्रकाश दूधकोहळे, संदीप येसनखेडे, अमर मुरार, मेघरे रामकुमार बासू आदींनी परिश्रम घेतले.