वाशीम,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय 'Man Ki Baat' ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १३३ वा भाग आज वाशीम शहरात उत्साहपूर्ण वातावरणात ऐकण्यात आला. आमदार श्याम खोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शहराध्यक्ष मनीष मंत्री यांच्या नियोजनाखाली मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमित प्रमोद गंडागुळे उपस्थित होते.
'Man Ki Baat' यावेळी पंतप्रधानांनी विज्ञान व विकास, अंतरिक्ष व तंत्रज्ञान, पवन ऊर्जा, भगवान बुद्धांचे विचार, अन्नदात्यांची मेहनत, नारी शक्ती, पर्यावरण संवर्धन आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नगराध्यक्ष अनिल केंदळे, नगरसेवक गणेश खंडाळकर, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष रामा इंगळे, जिल्हा महामंत्री संगीताताई इंगोले, कपिल सारडा यांच्यासह महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी ‘मन की बात’ मधील विचार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.