समृध्दीवर टायर फुटल्याने झालेल्या अपघातात पाच जखमी

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
वाशीम, 
Accident on Samriddhi Highway स्कार्पिओ वाहनाचा समोरील टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान समृध्दी महामार्गावरील चॅनल क्र. १६७ वर घडली. याबाबत सविस्तर असे की, सकाळी ७:३० सुमारास काशी विश्वनाथ वरून तापी गुजरात येथे जाण्यासाठी निघालेली स्कार्पिओ क्रमांक जेजी ५ जेओ १३५३ क्रमांकाची स्कार्पिओ चारचाकी वाहनाचा समृद्धी महामार्ग चॅनल क्रमांक १६७ वर समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी दुभाजकाला लागून पलटी झाली.
 
 
apghat
 
Accident on Samriddhi Highway  या अपघातात शोएब खान (वय ३५), खुशबू निसा शोएब खान (वय ३०), अरमान खान (वय १२), जिशान खान (वय १०), येराना खान (वय ८) सर्व रा. तापी गुजरात यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी समृद्धी महामार्ग १०८ रुग्णवाहिका पायलट आतिश चव्हाण व डॉक्टर निलेश राठोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी सागर मस्के यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी रेफर केले. त्यावेळी मदतीसाठी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख, समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार व आई एकवीरा रुग्णवाहिकेचे विनोद खोड, कक्षा सेवक विजय शिरसाठ, अधिपारीचारिका पल्लवी हे प्रामुख्याने मध्ये साठी उपस्थित होते.