केळी बागांची होरपळ, संत्र्यांचा बहार गळतोय

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
Banana farmers: Heatwave hits hard तालुयातील शेकडो शेतकर्‍यांच्या शेतांमधील संत्रा बागांमध्ये आंबिया बहाराला गळती लागली असून सुमारे ४ हजार एकरातील केळीच्या बागा वाढत्या पार्‍यामुळे होरपळत आहे. रेहकी, सेलू आणि घोराड शिवाराला या उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. यंदा तापमानाने नवीन उच्चांक गाठला आहे. साधारणत: ४० किंवा ४२ अंश सेल्शियस उष्णतेत देखील संत्रा आणि केळी बागांमधील झाडं तग धरतात. अर्थात, त्या बागांना आठवड्यातून दोनदा सिंचनाची व्यवस्था करणे अनिवार्य असते.
 
 
banana
 
Banana farmers: Heatwave hits hard  यावर्षी मार्च महिण्यातच दिवसागणिक उष्णतामान वाढत गेले. परिणामी, सिंचनाची सोय झाली तरी पारा यावर्षी ४५.५ अंशावर गेल्यामुळे संत्रा बागातील झाडांना आलेला बार गळताना दिसत आहे. केळीच्या बागांची अवस्था देखील फारशी वेगळी नाही. तापमान वाढीमुळे रात्रीच्या प्रहरी जंगली वन्यप्राण्यांचा संचार वाढला. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या सुमारास सिंचनासाठी धजावत नाही. या वाढत्या उष्णतामानात आंब्यांची झाडं मात्र फळांनी भरलेली दिसतात. पण, पूर्वी सारख्या आमराया आता शिल्लक नाहीत. या हवामानामुळे उत्पादन घटण्याची शयता आहे. परिणामी, आवक घटल्यामुळे बाजारात तेजी असली तरी, त्याचा लाभ शेतकर्‍यांना नियोजित वेळी मिळणार नाही, एवढे