बोगस सेवा केंद्रांवर प्रशासनाची धडक कारवाई

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
आकस्मिक तपासणीत ६ केंद्रांवर धडक
नागरिकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
 
वाशीम, 
Bogus service center जिल्ह्यात अनधिकृत सेवा केंद्रांचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलत धडाकेबाज कारवाई केली आहे. शासकीय सेवांच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल व आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वाशीम शहरात व अनसिंग येथे ही मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनी केवळ अधिकृत सेवा केंद्रांचाच वापर करावा आणि शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापलीकडे कोणतेही अतिरिक्त पैसे देऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
 
seva
 
Bogus service center  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार आकाश वर्मा आणि जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ जैन यांच्या नेतृत्वाखाली अचानक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या धडक कारवाईत वाशीम तालुक्यातील ६ अनधिकृत सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनधिकृत व्यवसायांना मोठा धक्का बसला आहे. तपासणीदरम्यान नागरिकांची दिशाभूल करणारे फलक व पोस्टर्स तत्काळ हटविण्यात आले. तसेच या केंद्रांद्वारे वापरात असलेले यूजर आयडी निष्क्रिय करण्याचा प्रस्ताव सक्षम प्राधिकार्‍याकडे सादर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, अशा प्रकारच्या अनधिकृत सेवा केंद्रांविरुद्धची कारवाई भविष्यातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांनी सजग राहून शासकीय सेवांसाठी केवळ अधिकृत केंद्रांवरच विश्वास ठेवावा व कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.