बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित यंदाचे मानकरी

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
- शमशेर खान, महेंद्र पाटील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलेटिक्स व खो-खो प्रशिक्षक
- भाऊ स्मृती उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार
 
नागपूर, 
खेळाडूंच्या अनेक पिढ्या घडविणार्‍या प्रशिक्षकाला मानाचे स्थान मिळावे व नवोदित प्रशिक्षकांना योग्य सन्मान मिळावा, या उद्देशाने नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ आणि चैतन्य स्पोर्ट्स, योगा व कल्चरल फाउंडेशन तीनवर्षांपासून भाऊ स्मृती उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार देत आहे. एक लाख रुपये रोख, विशेष स्मृतीचिन्ह, शाल व असे स्वरूप असलेल्या जीवनगौरव पुरस्काराचे यंदाचे मानकरी ज्येष्ठ Boxing coach Ganesh Purohit बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित ठरले आहेत, अशी माहिती नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ व चैतन्य स्पोर्ट्सचे सचिव प्रशांत जगताप यांनी दिली.
 
 
ganesh purohit.JPG
 
येत्या १४ मे रोजी भाऊंच्या वाढदिवशी पुरस्काराचे वितरण होणार आहे. गांधीसागर तलाव महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता हा होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, मंडळाचे अध्यक्ष धनंजय काणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
 
 
गेल्या ४० वर्षांपासून प्रशिक्षणाची धुरा सांभाळणारे ७० वर्षीय एनआयएस Boxing coach Ganesh Purohit  प्रशिक्षक गणेश पुरोहित अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले असून सध्याची आशियाई विजेती आल्फिया पठाण हे प्रमुख आहे. याशिवाय आशियाई युवा स्पर्धेतील पदकविजेता देशमुख, समीक्षा सिंग, संजय जोरदार, सलमान शेख, आरती भोसले हे अन्य खेळाडू घडविण्यात पुरोहित यांचा मोलाचा वाटा आहे. यंदा शमशेर खान हे सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलेटिक्स पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. २१ हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्यावर्षी जागतिक ज्युनिअर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा नयन सरडे, यंदा इंडियन ओपन शंभर मीटर शर्यत जिंकणारा अनिकेत नलावडे, शमशेर खान यांचे प्रमुख खेळाडू आहेत. कार्यक्रमाला क्रीडा प्रेमी, प्रशिक्षक, खेळाडू यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष धनंजय काणे यांच्यासह चैतन्य स्पोर्ट्सच्या अध्यक्ष चारुलता नायगावकर-बेहेरे, शिरीष भगत, शांताराम पांडे, नरेश शेळके, प्रशांत उळाभाजे आदी उपस्थित होते.
 
पाटील पहिले मानकरी
नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ म्हटले की सर्वप्रथम खो-खो डोळ्यापुढे येतो. त्यामुळे यंदापासून सर्वोत्कृष्ट खो-खो प्रशिक्षकालाही सन्मानीत निर्णय घेण्यात आला. हा पहिला पुरस्कार काटोल येथील विदर्भ युथ क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे प्रशिक्षक महेंद्र पाटील यांना देण्यात येणार आहे. २१ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.