कोळसा भरलेल्या मालगाडीवर चढलेल्या युवकाचा मृत्यू

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
ओएचई वायरला स्पर्श करताच बसला विजेचा धक्का
आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू
 
 
नागपूर, 
मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ या case at Homeland Platform  होमलँड प्लॅटफॉर्म येथील ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. रविवारी एका युवकाने अचानक फलाटावर उभी असलेल्या ट्रेनवर चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो ओव्हरहेड इक्विपमेंट वायरच्या संपर्कात आला. त्यामुळे त्याला जबर विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे तो खाली कोसळला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
 
 
malgadi-one
 
ही घटना मुख्य रेल्वे स्थानकाच्या case at Homeland Platform होमलँड प्लॅटफॉर्म येथे घडली. मृत युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. रेल्वे आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृत युवक भिकारी किंवा मनोरुग्ण असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३५ वर्षांचा एक युवक दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास तो होमलँड प्लॅटफॉर्मच्या गुड्स सायडिंगवर उभी असलेल्या कोळसा भरलेल्या मालगाडीवर अचानक चढला. मात्र, काही तो ट्रेनच्या वर असलेल्या ओएचई वायरच्या संपर्कात आला. त्यामुळे त्याला तीव्र विजेचा धक्का बसून तो खाली पडला. जवळ जाऊन पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचे आढळले. दरम्यान, या घटनेत ओएचई तुटल्याने काही काळ विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. माहिती मिळताच ओएचई पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि दुरुस्तीचे काम पूर्ण रेल्वे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला.