देश 'हॉट' मोडवर: कुठे सूर्याचा कोप, तर कुठे पावसाचा अलर्ट!

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
rain alert देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा कहर वाढण्याची चिन्हे दिसत असून हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. उत्तर भारतासह मध्य भारतात पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यानंतर तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच काळात पूर्व आणि ईशान्य भागात ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता असल्याने वातावरणात मोठा बदल जाणवू शकतो.
 
rain alert
 
गेल्या चोवीस तासांत पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये पावसासह वादळी वारे वाहिल्याची नोंद झाली आहे, तर दुसरीकडे उत्तर आणि वायव्य भारतातील अनेक भाग उष्णतेने होरपळले आहेत. rain alert हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश तसेच हिमालयीन पट्ट्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
 
पुढील काही दिवसांतील परिस्थितीकडे पाहिले असता, पश्चिम हिमालयीन भागात सुरुवातीला तापमान स्थिर राहील, मात्र त्यानंतर काही अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. rain alert वायव्य आणि पूर्व भारतातही तापमान काही दिवस स्थिर राहून नंतर कमी होईल. ईशान्य भारतात मात्र तापमानात वाढ होऊन नंतर ते स्थिर राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही सुरुवातीला उष्णतेची तीव्रता कायम राहून त्यानंतर काहीशी घट जाणवू शकते.
 
दरम्यान, काही राज्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता लक्षात घेता इशारा जारी करण्यात आला आहे, तर कर्नाटकातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये उष्णतेच्या लाटेचा विशेष इशारा देण्यात आला आहे. rain alert आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्येही पावसाची शक्यता कायम आहे.
 
तापमान वाढत असल्यामुळे आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते. जास्त वेळ उन्हात राहणाऱ्या व्यक्तींना उष्माघाताचा धोका वाढू शकतो. rain alert त्यामुळे नियमित पाणी पिणे, हलके आणि सैल कपडे परिधान करणे, तसेच शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे गरजेचे आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजाराने त्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.