विकास कामांमुळे रेल्वेगाड्यांना विलंब
नागपूर,
Crowd of Central Railway passengers मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर सध्या पुनर्विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तसेच इतर रेल्वे मार्गावर सुद्धा विकास कामे सुरू असल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. याशिवा उन्हाळी सुटी असल्यामुळे आठवडाभरापासून गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रविवारी रेल्वे गाड्यांच्या विलंबामुळे ताटकळत राहावे लागले.
Crowd of Central Railway passengers जवळपास डझनभर गाड्या तासनतास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना प्रतिक्षालयात प्रतिक्षा करावी लागत आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नागपूरला येणार्या गाड्यांपैकी पुणे समर स्पेशल एक्स्प्रेस,गीतांजली एक्स्प्रेस, बेंगळुरू स्पेशल एक्स्प्रेस, दानापूर समर स्पेशल, छत्तीसगड एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस विलंबाने आली. ऐन उन्हाळ्यात गाड्यांच्या उशिरा येत असल्याने लहान मुले वृद्ध प्रवाशांची मोठी ससेहोलपट होत आहे.