विद्युत देयक भरणा करण्यासाठी ग्राहकांना सोसावे लागतात उन्हाचे चटके

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
नेर, 
Electricity Bill Payment Center येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या देयक भरणा काऊंटरवर विद्युत देयक भरण्यासाठी येणाèया ग्राहकांना उन्हाचे चटके सोसत रांगेत उभे राहावे लागते. मात्र ग्राहकांना होणाèया या त्रासाची या कार्यालयातील अधिकारी वर्गाला तीळमात्र फिकिर नसल्याचे आढळून आले आहे. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयीन इमारतीचे नूतनीकरण व डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे या इमारतीतील सर्व विभाग बाजूच्याच एका रहिवासी निवासामध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे.
 
 
mahavitaran
 
यामधील वीज बील भरणा काऊंटरच्या खिडकीलगत खुले पटांगण आहे. विद्युत देयक भरण्यासाठी इथे ग्राहकांची गर्दी होत असल्यामुळे त्यांना बराच वेळपर्यंत रांगेत उभे राहावे लागते. पण काऊंटरच्या बाहेरील पटांगणात देयक भरण्यासाठी उभे असणाèया ग्राहकांसाठी सावली देणाèया छताची सुविधा वीज कंपनीने उपलब्ध करून दिलेली नाही.
 
 
Electricity Bill Payment Center  त्यामुळे ग्राहकांना तापत्या उन्हाचे चटके सहन करतच येथे उभे राहावे लागते. येथील अधिकारी हे दृश्य पाहत आहेत, मात्र काहीही व्यवस्था करीत नाहीत, अशी ग्राहकांची तक्रार आहे. हे पर्यायी कार्यालय या इमारतीमध्ये आणखी किती दिवस राहील याचीही निश्चिती नाही. सध्या वाढत्या तापमानामुळे असह्य होत आहे आणि अशा उन्हात उभे राहणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. वीज वितरणच्या अधिकाèयांनी या बाबीकडे लक्ष देऊन या काऊंटरसमोर रांग लावणाèया ग्राहकांना होणाèया उन्हाच्या त्रासापासून दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.