झेडआरयूसीसीची बैठकीत ग्रीन जिमची मागणी
नागपूर
Fitness zones in superfast trains रेल्वे प्रवासादरम्यान जाणवणारा थकवा आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी सुपरफास्ट गाड्यांमध्ये इन-कोच योग आणि ग्रीन जिम (फिटनेस झोन) सुरू करण्यात यावा, असा प्रस्ताव मध्य झेडआरयूसीसीच्या बैठकीत मांडण्यात आला. झेडआरयूसीसीची १२७ वी बैठक झाली. यावेळी सदस्यांनी प्रवाशांच्या सोयीसुविधांच्या संबंधाने वेगवेगळे उपाय सुचिवले. अशाच पैकी एका सदस्याने फिटनेस झोनची आवश्यकता विशद केली.
’सीट-योग’ व्हिडीओ दाखवा
इन-ट्रेन योग’ मार्गदर्शनाअंतर्गत गाड्यांमधील स्क्रीनवर किंवा रेल्वेच्या ’रेल मदत’ आणि पोर्टलवर ५ ते १० मिनिटांचे ’सीट-योग’ व्हिडीओ दाखवावेत. तसेच मार्गदर्शनाचे स्टिकर्स डब्यांच्या गॅलरीत किंवा दरवाजाजवळ लावावेत. राजधानी, दुरंतो आणि वंदे भारतसारख्या प्रीमियम गाड्यांच्या वेस्टिब्यूल भागात (दोन डब्यांना जोडणार्या जागेत) छोटे ’कॉम्पॅक्ट जिम’ उपकरणे, रेजिस्टन्स बँड्स किंवा स्थिर पेडल सायकल बसवाव्यात.
पाठदुखी, अंगदुखी पासून दिलासा द्या
Fitness zones in superfast trains रेल्वेच्या डिजिटल पोर्टलद्वारे प्रवाशांना व्यायामासाठी रिमाइंडर तसेच आरोग्यविषयक सूचना पाठवाव्यात. याशिवाय आयुष मंत्रालयाशी समन्वय साधून योग तज्ज्ञांच्या सत्रांचे प्रसारण ऑडिओ प्रणालीद्वारे करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. या उपाययोजनांमुळे प्रवासादरम्यान होणार्या पाठदुखी, अंगदुखी आणि सुस्तीपासून प्रवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.