श्रीपरशुराम जन्मोत्सव रॅलीचा दीनदयालनगरात समारोप

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Gorakshan, Dhantoli श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित स्कूटर व कार रॅलीचा समारोप दीनदयालनगर येथील श्रीपांडुरंगेश्वर शिव मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रविवार, दि. २६ एप्रिल रोजी सकाळी गोरक्षण धंतोली येथून प्रारंभ झालेली ही रॅली विविध भागातून मार्गक्रमण करत सकाळी १०.३० वाजता मंदिर परिसरात पोहोचली.
 
 

dhantoli 
 
 
 
रॅलीत भगवान श्री परशुराम व माता श्री रेणुका यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मंदिर संस्थेचे अध्यक्ष दिलीप कातरकर, सचिव दीपक पथे, कोषाध्यक्ष मुरलीधर कु-हेकर तसेच व्यवस्थापन मंडळाचे तुषार कवीश्वर व राजीव भूत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमस्थळी सुहासिनींनी औक्षण करून रथाचे स्वागत केले.समारोप प्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपूरचे अध्यक्ष पराग जोशी यांनी प्रास्ताविक केले,Gorakshan, Dhantoli प्रमुख वक्त्या डॉ. शुभा साठे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर राजीव हडप, नगरसेवक दिलीप दिवे, सुनील दांडेकर, ईश्वर डेंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जय पाठक यांनी केले.या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नागपूर यांनी केले होते.
सौजन्य:सतीश देशपांडे ,संपर्क मित्र