अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी देहदान करणार्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार 'Guard of Honour' ’गार्ड ऑनर’ने करण्यात यावे, अशी मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारला पाठविली आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही ’गार्ड ऑफ ऑनर’ची अंमलबजावणी होणार आहे. अवयवदानाच्या महादानाला योग्य तो सन्मान मिळवून देण्यात मध्य प्रदेश सरकारने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातही ’गार्ड ऑफ ऑनर’ची अंमलबजावणी झाल्यास एक आदर्श निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया देहदान संस्थेचे चंद्रकांत मेहर यांनी व्यक्त केली आहे.
अवयवदानासाठी सन्मानजनक मोहीम
मुख्यत: अवयवदान करणार्या व्यक्तींना राज्य सरकारकडून 'Guard of Honour' गार्ड ऑफ ऑनर मिळाल्यास अवयवदानाला प्रोत्साहन मिळणार आहे. ही अनोखी आणि सन्मानजनक मोहीम राज्य सरकारने राबविण्याची नितांत गरज आहे. यामुळे देहदान आणि अवयवदानाच्या महादानाला योग्य तो सन्मान देता येईल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते पराते यांनी व्यक्त केला.
एक अत्यंत उदात्त कार्य
देहदान आणि अवयवदानाच्या महादानाला योग्य तो सन्मान देण्यासाठीच केंद्र सरकारने हा उपक्रम सुरु करण्याचा उद्देश ठेवला आहे. देहदान म्हणजे मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय महाविद्यालय किंवा संशोधन संस्थेला अभ्यासासाठी दान करणे. हे एक अत्यंत उदात्त कार्य असून, यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीररचनेचा करता येतो,अशी प्रतिक्रिया डॉ.अजय काळे यांनी दिली.
प्राण वाचविण्यासाठी अवयवदानाचा लाभ
वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी या अवयवाचा उपयोग होत असतो. अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी याच अवयवदानाचा लाभ होतो. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी महत्त्वाचे असणार्या देहदान प्रक्रियेत नागरिकांनी आपले नाव नोंदविल्यास अनेकांना लाभ मिळू शकतो. यासाठी शासनाकडून मिळणार्या प्रोत्साहानाची गरज आहे.
अशी परंपरा सर्वांसाठी प्रेरणा देणारी
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल संपूर्ण समाजाची कृतज्ञता दर्शवणे असून राज्य सरकार अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी 'Guard of Honour' गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्याची परंपरा सर्वांसाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे. विशेषत: अवयवदात्यांच्या अंतिम वेळी पोलीस किंवा प्रशासकीय अधिकार्यांद्वारे ही मानवंदना दिली जाणार आहे. मृत सन्मान राखण्यासोबतच अवयवदानकर्त्यांच्या कुटुंबीयांचा सार्वजनिक कार्यक्रमांत गौरव केल्या जाणार आहे.यात प्रामुख्याने १५ ऑगस्ट, २६ जानेवारी तसेच महाराष्ट्र दिन प्रसंगी किंवा राज्य स्थापना दिनी अशा कुटुंबांचा सत्कार करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे.