नागपूरला हिट व्हेवचा तडाखा

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
शीतपेयांच्या मागणीत वाढ
उपराजधानी झाली ’हॉट’
तापमान ४५.४ अंशांवर

नागपूर
वाढत्या उष्णतेच्या आणि दमट हवामानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मध्यवर्ती नागपूर Heat wave hits city शहराला हिट व्हेवचा तडाखा बसला आहे. रविवारी नागपूरचे तापमान ४५.४ अंशांवर होते. यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच सर्वाधिक तापमान ४५.४ अंश सेल्सिअस नोंदविले. तर विदर्भात सर्वाधिक तापमान अकोला शहराचे ४६.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली.
 
 
tem
 
नागरिकांनी घेतला शीतपेयांचा
एप्रिल अखेरीस उष्णतेचा कहर दिसून येत असताना शनिवारी नागपूर शहरातील तापमानात ४४.२ अंश सेल्सिअस होते. हिट व्हेवचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आता शीतपेयांचा आधार घेतला आहे. शहरातील रसवंती, लस्सी, लिंबू शरबत आईसक्रीम आदींची मागणी वाढली आहे. सकाळपासूनच उष्णतेचे चटके जाणवत असल्याने सावलीचा शोध नागरिकांना घ्यावा लागला. नागपूर शहराच्या चहुबाजूने वातावरण हॉट असल्याने रुमाल, टोपी, दुप्पटटा, सन गॉगल्स आदींची मागणी वाढली आहे.
तापमान ४६ अंशाचा उंबरठ्यावर
Heat wave hits city  मुख्यत: उष्णतेचा कहर लक्षता घेता हिट वेव्हचा सामना नागरिकांना मे महिन्यात सुध्दा करावा लागणार आहे. उपराजधानीचे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले असून ४६ अंशाचा उंबरठ्यावर पोहोचण्यास वेळ लागणार नाही. दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते निर्मनुष्य आहेत. सकाळपासूनच उन्हाचा तडाका असह्य होत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कामगारांना या उष्णतेचा मोठा बसला आहे. दरम्यानच्या काळात नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे पाण्याचे सेवन वाढवावे व उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सुचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.
उष्णतेचा वाढणार
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हवामानात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच रात्रीच्या तापमानात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर हळूहळू किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.एकूणच, मे महिन्याच्या सुरुवातीस काहीसा हवामानाचा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी, उष्णतेचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाचे डॉ.प्रविणकुमार यांनी दिली आहे.