डेहराडून
Chardham Yatra यंदाच्या चारधाम यात्रेसाठी भाविकांत प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. २२ एप्रिल ते १५ जून या कालावधीसाठी केदारनाथ हेलिकॉप्टर शटल सेवेचे ऑनलाइन बुकिंग अवघ्या ९० मिनिटांत फुल्ल झाले आहे. उपलब्ध सर्व ३०,४५० जागांचे बुकिंग पूर्ण झाले असून, अधिकृत ‘आयआरसीटीसी’ पोर्टलवरून १०,८५५ तिकिटे जारी केली. १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता बुकिंग सुरू झाले आणि ७.२८ वाजेपर्यंत सर्व तिकिटे संपली.
Chardham Yatra गुप्तकाशी, फाटा व सिरसी येथून ही हेलिकॉप्टर सेवा दिली जाते. बेस कॅम्पपासून मंदिरापर्यंत शटल सेवेने भाविकांची 16 किमीची पायपीट वाचते. सर्वाधिक १७०८ यशस्वी ट्रॅन्झॅक्शन्स महाराष्ट—ातून झाली आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेश (१२४३), दिल्ली (८६७), तेलंगण (८६४ ), कर्नाटक (८०१ ) आणि गुजरात (७०० ) चा क्रमांक लागतो.
आता ‘आयपी’वर नजर
Chardham Yatra संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राज्य सरकारने कडक तांत्रिक नियम लागू केले होते. एका ‘आयपी’ अॅड्रेसवरून केवळ ५ युजर आयडी बनवण्याची मर्यादा होती. तसेच एका युजरला जास्तीत जास्त २ बुकिंग आणि १२ सीट्स, तर एका बुकिंगमध्ये जास्तीत जास्त ६ प्रवाशांचीच नोंदणी करण्याची मुभा होती. दरम्यान, अधिकृत नोंदींनुसार आतापर्यंत ५१० बुकिंग आयडींवरून ९१३ सीट्स रद्द देखील करण्यात आल्या आहेत.