हिदी विद्यापीठाजवळील टेकडीला आग

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
Hindi University Hill विश्व हिंदी विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या मागील टेकडीवर आग लागली वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने आगीने उग्र रुप धारण केले. मात्र, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठून आग नियंत्रणात आणली. ही घटना आज रविवार २६ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
 
 
aag
 
Hindi University Hill सूर्य आग ओकू लागल्याने अनेक ठिकाणी आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे वाळलेल्या गवताने पेट घेतला. आग वेगाने पसरू लागली. परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.