पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा,
Investment fraud लवकर श्रीमंत होण्याचे आमिष दाखवून महिलेला ५ लाख रुपयांनी गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सावंगी मेघे पोलिसांनी पाच जणांंवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या बिनाकी ले-आऊट येथील लिला बारापात्रे (४८) या महिलेची वाडी येथील ज्योती सोमकुवर हिच्याशी ओळख होती. ज्योतीने तिचे साथीदार सचिन व सपना यांच्या मदतीने लवकर श्रीमंत होण्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर तिघांनी महिलेला आणखी दोन अज्ञात व्यतींशी भेट करून दिली.
Investment fraud विश्वास संपादन करून महिलेला पैसे घेऊन वर्धा-नागपूर महामार्गावरील नागठाणा येथील पुलाखाली बोलावण्यात आले. तेथे महिलेकडून ५ लाख रुपये उकळण्यात आले. काही दिवसांनी अधिक रकम परत मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, नंतर आरोपींनी महिलेचे फोन उचलणे बंद केले. प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. या प्रकरणी लिला यादव यांच्या तक्रारीवरून सावंगी मेघे पोलिसांनी ज्योती सोमकुवर, सचिन, सपना आणि अन्य दोन अज्ञात व्यतींविरोधात गुन्हा दाखल केला