महाराष्ट्र महापौर परिषदेची बैठक निर्णय
नागपूर,
Maharashtra Mayors Council meeting decision अखिल भारतीय स्थानिक स्वराज् संस्थेच्या महोत्सवी वर्षात महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षाचा मला बहुमान मिळाला.सुमारे साडेचार वर्षानंतर महाराष्ट्र महापौर परिषदेच्या रूपाने राज्यातील महापौरांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. अध्यक्ष या नात्याने आपले प्रश्न मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात रितू तावडे यांनी दिली.
महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्ष व मुंबईच्या रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र महापौर परिषदेची बैठक अंधेरीत झाली.बैठकीत नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची महाराष्ट्र महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. तर रणजित चव्हाण यांनी महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष रितू तावडे,उपाध्यक्ष नीता ठाकरे आणि उपस्थित सर्व
महापौरांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
Maharashtra Mayors Council meeting decision बैठकीला कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, संयोजक लटके,ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, भाईदरच्या महापौर डिंपल मेहता,वसई विरारचे महापौर अजीव पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील,कल्याण डोंबिवलीच्या महापौर हर्षाली चौधरी थवील, भिवंडी निजामपूरचे महापौर नारायण चौधरी, धुळेच्या महापौर मायादेवी परदेशी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे,कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, जालनाच्या महापौर वंदना मगरे, ,परभणीचे महापौर इकबाल नांदेड वाघाळाच्या महापौर कविता मुळे आदी राज्यातील विविध महानगरपालिकेचे महापौर उपस्थित होते.
महापौरांना मिळाले हक्काचे व्यासपीठ
परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, राज्यातील महापौरांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी २०१२ साली त्याळेचे महापौर सुनील प्रभू यांच्या अध्यतेखाली महाराष्ट्र महापौर परिषदेची स्थापना झाली. महाराष्ट्र महापौर परिषदेच्या राज्यात पासून २१ बैठका झाल्या आणि १०१ ठराव मंजूर झाले. शासनाकडे पाठवलेले काही ठराव मंजूर झाले.महापौरांशी समन्वय साधण्यासाठी वॉट्सअप ग्रुप स्थापन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.