आर्वी,
Mann Ki Baat पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमात आर्वी विधानसभा मतदार संघाने महाराष्ट्रात इतिहास रचला आहे. मन की बात १३२ व्या मालिकेत आर्वीचा प्रथम क्रमांक आल्याने त्यातून प्रेरणा घेत वर्धा जिल्ह्यातील इतर मतदारसंघात भाजपच्या संघटनात्मक शक्तीचे दर्शन घडवत आर्वी प्रथम, हिंगणघाट द्वितीय आणि वर्धा विधानसभा मतदारसंघ चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.
Mann Ki Baat आ. सुमित वानखेडे यांच्या संघटन कौशल्य आणि सुक्ष्म नियोजनामुळे आर्वी मतदारसंघाने १०० टके बूथ कव्हरेजचा टप्पा गाठला. अधिकृत आकडेवारीनुसार, आर्वी विधानसभा क्षेत्रातील सर्वच्या सर्व ३१० बुथवर १०० टके यशस्वीरित्या मन की बात ऐकण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ५ हजार ९०५ नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. हिंगणघाटमध्ये ९८.३ टके, वर्धा मतदारसंघात ९५.७ टके बुथवर हा कार्यक्रम पार पडला. आ. सुमित वानखेडे आर्वीच्या सक्रिय राजकारणात उतरले आहेत तेव्हापासून मतदारसंघाचा विकासात्मक आणि संघटनात्मक आलेख सातत्याने उंचावत आहे.