नागपूर,
Misleading Educational Advertisements शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिराती व पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नागपूर यांच्या वतीने शिक्षण मंत्र्यांना, जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी स्वीकारले. Misleading Educational Advertisementsयावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे, उपाध्यक्ष राजेंद्र दिवारे, सचिव प्रभाकर शिवणकर तसेच सदस्य प्रकाश क्षीरसागर उपस्थित होते.
सौजन्य : राजेंद्र दिवारे,संपर्क मित्र