मृत घोषित केलेला रुग्ण झाला जिवंत..!

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
बाभुळगाव, 
Pahoor: Arvind Lambade तालुक्यातील पहूर येथील रहिवासी अरविंद लंबाडे (वय 37) यांना वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे रुग्णालयात भरती केले होते. शनिवारी रात्री रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांना डॉक्टरांनी अरविंद लंबाडे यांचे निधन झाल्याचे सांगितले. नातेवाईकांनी निधनाची बातमी पहूर येथे कळवली व पहूर येथे रडणे सुरू झाले. सर्व नातेवाईकांना फोन करण्यात आले, सर्वजण गोळा झाले. इकडे सावंगीवरून एक वाहन भाड्याने करून पहूर गावी बॉडी घेऊन येत असताना.
 
 
Doc
 
Pahoor: Arvind Lambade  डेहणी गावाजवळ डॉक्टरांनी ज्यांना मृत झाल्याचे म्हटले होते. त्या अरविंद लंबाडे यांनी डोळे उघडले. वाहनातील नातेवाईक आश्चर्यचकित झाले. काहींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. यानंतर रुग्णाला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले व त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी त्यांच्या निकटवर्तींची प्रतिक्रिया उमटली आहे.