अभियंता शिवांगी राऊत यांना आदेश
पांढरकवडा,
येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी Pandharkawada Municipal Council नगर परिषद स्वछता विभागात कचरा हातगाडीच्या नावावर लक्षावधी रुपये काढण्याचा कट कारस्थानाकरिता मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्या होत्या. याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अभियंता यांना 15 दिवसांत माहिती देण्याचे आदेश माहिती अपीलीय अधिकाऱ्यानी दिले आहेत.
या प्रकरणात स्वच्छता अभियंता तथा माहिती अधिकारी आरोग्य विभाग Pandharkawada Municipal Council पांढरकवडा नगर परिषद यांच्याकडे बोरेले यांनी 2 मार्चला माहिती अर्ज दाखल केला होता. त्यात मुख्यधिकाऱ्यांची खोटी सही कोणी केली, त्या कनिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम आणि एकूण किती कचरा हातगाडी व देयक किती काढले आणि खोट्या सही करणाऱ्या विरुद्ध एफआयआर केला काय, अशी माहिती मागितली होती. माहिती अधिकारी व स्वच्छता अभियंता शिवांगी राऊत यांनी ही माहिती देता येत नाही, असे 10 मार्च रोजी बोरेले यांना कळविले होत. या विरुद्ध प्रथम अपीलीय अधिकारी तथा मुख्यधिकाऱ्यांकडे बोरेले यांनी अपिल केले होते. यावरील सुनावणी दरम्यान शिवांगी राऊत यांनी माहिती अधिकार कलम 8 (1) (ह) चा चुकीचा अर्थ काढला असल्याने मान्य करून मुख्याधिकारी तथा प्रथम अपिलीय प्राधिकारी पंकज गावंडे यांनी रजनीकांत बोरेले यांना 15 दिवसांत निशुल्क माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.