अयानच्याविरोधात आणखी एका पीडितेची तक्रार

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
परतवाडा फाईल्स
अमरावती, 
Parthwada sexual abuse case परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी अजून एका १६ वर्षीय पीडिता तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत रविवारी समोर आली आहे. सदर पीडितेने आरोपी अयान अहमद याच्या विरोधात तक्रार दिली आहे. अयानने तिच्या मर्जी शिवाय तिला स्पर्श केला असल्याचे तिने विशेष तपास पथकातील महिला अधिकार्‍यांसमक्ष सांगितले आहे. त्या अनुषंगाने मुळ गुन्ह्यातच कलम ७४ बीएनएस समाविष्ट करण्यात आलेले आहे. पुढील तपास सुरू आहे.
 
 
takrar
 
Parthwada sexual abuse case  दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी पाच आरोपींना २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तर तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पाच आरोपींची कोठडीची मुदत समोवारी संपत अल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नव्याने प्राप्त तक्रारीचा आधार घेऊन पोलिस त्यांच्या कोठडीची मागणी पोलिस करू शकतात. नव्या तक्रारीचा सखोल तपास विशेष तपास पथक करीत आहे. आणखी काही पीडिता समोर येण्याची अपेक्षा पोलिसांना आहे. पोलिस या प्रकरणात आणखी काही नवीन खुलासे करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.