पेट्रोलपंप लिजवाढ निषेधार्थ आज ‘उमरखेड बंद’

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
शिवप्रेमी सामाजिक संघटना व सर्व राजकीय पक्षांचा सहभाग

उमरखेड, 
Petrol pump lease extension छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा यांच्याभोवती अतिक्रमणात असलेला पेट्रोल पंप हटविण्यासाठी सोमवार, 27 एप्रिल रोजी शहर कडकडीत बंद राहणार असून, सकाळी 7 ते दुपारी 12 हा बंद राहणार आहे. या अंदोलनाची हाक सकल शिवप्रेमी सामाजिक संघटना व सर्वपक्षीय आंदोलकांकडून देण्यात आली आहे. भारत पेट्रोलियम पंपाची लिज 31 जुलै 2025 रोजी संपुष्टात आली असताना त्या वादग्रस्त पेट्रोलपंपाला लिज वाढ देऊ नये. यासाठी सकल शिवप्रेमी सामाजिक संघटना व सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन अांदोलन केले.
 

petrol 
 
Petrol pump lease extension  पण प्रशासनाने जनभावनेचा विचार न करता त्या वादग्रस्त पेट्रोलपंपाला लिज वाढवून दिली. त्या निषेधात सर्वपक्षीय सामाजीक संघटना व सकल शिवप्रेमींनी अांदोलनाची हाक दिली आहे. यावेळी उपविभागीय अधिकाèयांना निवेदन देण्यात येणार आहे. पेट्रोल पंप हटत नाही. तोपर्यंत लढाई संपूर्ण ताकदीने लढण्यात येईल, असे आवाहन सकल शिवप्रेमी व सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्षांनी केले आहे.