रेल्वे स्टेशन मास्टरचे आता स्टेशन मॅनेजर

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
भारतीय रेल्वेने दिला नवा सन्मान
 
नागपूर 
Railway Station Master now Station Manager रेल्वे वाहतुकीचे संचालन आणि प्रवाशांच्या तक्रारीपासून तो सुविधेपर्यंतची सर्व व्यवस्था सांभाळणार्‍या स्टेशन मॅनेजरचे पद भारतीय रेल्वे बोर्डाने आता खारीज केले आहे. पदाला सन्मान देत आता स्टेशन मॅनेजर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 
 
Station-Maneger
सुरळीत कारभाराचाही कणा
रेल्वे वाहतुकीचे संचालन आणि व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेले स्टेशन मास्टर रेल्वे स्थानकाच्या सुरक्षित व सुरळीत कारभाराचाही ’कणा’ मानले जाते. अलिकडे भारतीय रेल्वेने गती आणि सुधारणा या दोन्ही घटकांवर विशेष लक्ष दिल्याने साध्या पॅसेंजर गाड्यांपासून सुपरफास्ट एक्स्प्रेसपर्यंतच्या वेगळा लूक मिळाला आहे.
सर्व गाड्यांचे सुरक्षित संचालन
रेल्वे स्थानके चकाचक होऊ लागली वंदे भारत एक्स्प्रेससारख्या ट्रेनचा प्रवास आलिशान बनला आहे. अशा या सर्व गाड्यांचे सुरक्षित संचालन करण्याची, कोणती गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर घ्यायची, ती केव्हा सोडायची आणि पुढील सिग्नल कधी द्यायचा, सिग्नल व इंटरलॉकिंग यंत्रणेचे नियंत्रण, कंट्रोल ऑफिसशी सातत्याने गाड्यांच्या ये-जा व्यवस्थेचा समन्वय साधणे, तांत्रिक अडचण किंवा गोंधळ निर्माण होऊ नये, काळजी घेणे, प्रवासी सुरक्षा आणि, सुविधा, स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन, अपघात, तांत्रिक बिघाड किंवा अन्य आपत्कालीनप्रसंगी तातडीने निर्णय घेणे, या सर्व महत्त्वाच्या जबाबदार्‍यांची धुरा वाहणार्‍या पदावरील व्यक्तीला मात्र पारंपरिक स्टेशन मास्टर असेच संबोधले जात होते. आता मात्र ’स्टेशन ’स्टेशन मॅनेजर’ असे नाव आणि मान बहाल करण्यात आला आहे.
मूलभूत सुविधांची देखरेख
Railway Station Master now Station Manager  रेल्वेस्थानक प्रमुख म्हणून विविध विभागांतील कर्मचारी, तिकीट व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था अन् सर्वांमधील समन्वय राखणे स्टेशन मास्टरना करावे लागते. स्थानकावरील मूलभूत सुविधांची देखरेख ही प्रशासनिक जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागते. एवढेच काय, स्वच्छता, प्रकाशयोजना आणि आवश्यक सेवा ठेवण्यावर त्यांना भर लागतो. थोडक्यात एक पद अन् भाराभर जबाबदार्‍या अशी या पदावरील व्यक्तीची स्थिती असते.
अंमलबजावणीही सुरू
’स्टेशन मास्टरच्या नवीन पदनामाचे आदेश दोन दिवसांपूर्वी आम्हाला मिळाले. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यानुसार त्यांना आता स्टेशन मास्टर नव्हे तर स्टेशन मॅनेजर म्हणून संबोधले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी दिली.