आशुतोष अडोणी यांचे प्रतिपादन
राष्ट्रसेविका समितीचा प्रांतीय परिसंवाद
अमरावती,
Rashtrasevika Samiti राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाचा संग्राम, भारताचा चेतनेचा प्रदीर्घ इतिहास आहे. बाह्य देशांना नेहमीच भारताच्या समृद्धी आणि संपत्तीने आकृष्ट केले आहे. १८३५ पासून संघटितपणे आणि विचारपूर्वक या राष्ट्राच्या मुळांना जाणीवपूर्वक दुर्बल करण्याचा प्रयत्न केला गेला. मेकॉले यांनी सर्वात प्रथम भारताने भारताची ओळख विसरावी हा प्रयत्न केला. कारण भारताने ‘स्व’ला म्हणजेच देशाच्या चैतन्याला विसरावे म्हणजे राष्ट्र चेतनेला धक्का पोहचेल, अशी त्यांची धारणा होती. सत्ता हे समाजाचे एक अंग असते आणि समाजाने स्वतःचे शाश्वत चिंतन करायचे असते. १८३५ ते १९४७ या काळात आपल्या राष्ट्रीय सिद्धांतला खिळखिळीत केले गेले, असे मत ‘वर्तमान काळातील भारताची सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक परिस्थिती’ या विषयावर बोलताना संस्कार भारतीचे अखिल भारतीय मंत्री आशुतोष अडोणी यांनी व्यक्त केले.
Rashtrasevika Samiti राष्ट्रसेविका समिती विदर्भ प्रांत आणि नरसम्मा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नारी से नारायणी - विकसित भारत २०४७: महिलांची भूमिका व योगदान’ या विषयावर आयोजित एक दिवसीय प्रांतीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रा. स्व. संघाचे विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू तर प्रमुख अतिथी म्हणून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात चंद्रशेखर भोंदू यांनी नरसम्मा यांच्या नावे ही संस्था का सुरू आहे, याची पार्श्वभूमी सांगितली. कुटुंब परिवर्तनाच्या काळात उपस्थित होणार्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या जवळ असावे, अशी तयारी महिलांना करावी लागेल, असेही ते म्हणाले.
Rashtrasevika Samiti या प्रसंगी ‘नारी से नारायणी’ या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार्या माधुरी चेंडके यांनी नारायणी हा केवळ शब्द नव्हे तर जबाबदारी आहे, नीतीमूल्य हे कुटुंबातूनच येऊ शकते. आज सर्वच क्षेत्रात महिला अग्रणी आहेत, असे मत मांडले. यावेळी गायत्री विप्रादास यांनी प्रस्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय स्मिता सूर्यवंशी यांनी करून दिला. परिसंवादाला अनेक मान्यवर विदर्भातील प्रबुद्ध भगिनी उपस्थित होत्या.