वर्धा,
Samruddhi Highway: Accident समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून २५ एप्रिल रोजी पुन्हा कार चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंडियन पेट्रोल पंपाजवळ घडला. राहुल यादव असे मृतकाचे नाव आहे. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वापी छेरी येथील धनंजय पटेल (४५) हे कुटुंबासह बनारसहून वापीकडे जात होते. कार त्यांचा मित्र राहुल यादव (रा. उत्तर प्रदेश) हा चालवित होता. सकाळी ६ वाजताच्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे जाणार्या मार्गावर इंडियन पेट्रोल पंपाजवळ एम. एच. ३४ बी. जी. ७९६९ क्रमांकाचा मालवाहू उभा होता.
Samruddhi Highway: Accident अचानक हे वाहन दिसल्याने चालकाचा ताबा सुटला आणि जी. जे. १५ सी. एम. २८९८ क्रमांकाची कार मालवाहूवर आदळली. यात चालक राहुल यादव याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये धनंजय पटेल यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुले होती. त्यांनाही किरकोळ दुखापत झाली असून जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल यादव यांना पुलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉटरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.