संत भोजाजी जेष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने चष्मे वाटप

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
आजनसरा, 
Sant Bhojaji Foundation ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरचे हिंगणघाट-समुद्रपूर तालुका संयोजक डॉ. विजय पर्बत यांच्या उपस्थितीत शनिवार २४ रोजी दारोडा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हेते. डॉ. विजय पर्बत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. वयस्कर माणसाला आधाराची गरज असते. औषधापेक्षा आपुलकीची जास्त गरज असते. म्हणूनच आम्ही हे शिबिर घेतले, असे म्हणत त्यांनी उपस्थित ज्येष्ठांना धीर दिला.
 
 
shivir
 
Sant Bhojaji Foundation  शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉटरांच्या पथकाने शिबिरात १९० रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी १०५ गरजू रुग्णांना डॉ. विजय पर्बत यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. चष्मा मिळाल्यावर एका आजीच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू पाहून डॉ. पर्बतही भावुक झाले. १३ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले असून त्यांच्या शस्त्रक्रियेची सर्व जबाबदारी डॉ. पर्बत यांच्या माध्यमातून शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात येणार आहे. यावेळी प्रतिष्ठानचे ग्रामीण अध्यक्ष गंगाधर कोल्हे, सचिव सुधाकर डेकाटे, हिंगणघाट शहर अध्यक्ष कमलाकर ठाकरे, सचिव गणपत गाडेकर, गणेश सोनोने, विनोद नागोशे, रमेश गोहाडे, मोहन गंडाईत, गजानन वाट, भाऊराव कोटकर, शामराव टापरे, अमोल गहेरवाल, दिलीप उगेमुगे, संजय फटिंग, रवी टापरे, आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डॉ. संदीप लोंढे, अविनाश जौंजाळ, अश्विन भांडवलकर, बालू पाटील यांनी परिश्रम घेतले.