वर्धा,
Scholarship exam जिल्ह्याच्या तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडला असून वाढत्या उष्णतामानामुळे शाळांच्या वेळांत बदल करण्यात आल्या आहे. याच पृष्ठभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत जिल्ह्यात आज २६ एप्रिलला सकाळी ११ व दुपारी २ असे दोन सत्रात चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. अक्षश: घामाघुम होत ११ हजार ७०३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा पहिला पेपर सोडविला. पहिल्या पेपरला ५३१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
Scholarship exam इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी ५० परीक्षा केंद्र तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी ३९ परीक्षा केंद्रांवरून ही परीक्षा दिली. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथ.) सीमा पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली होती. शिवाय वाढत्या उन्हाचा विचार करून परीक्षा केंद्रांवर आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकार्यांना माहिती देण्यात आली होती. भाषा व गणितचा पहिला पहिला पेपर सकाळी ११.०० ते १२.३० या वेळेत घेण्यात आला. ५३१ विद्यार्थी पहिल्या पेपरला गैरहजर होते. तसेच तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी हा दुसरा पेपर दुपारी २.०० ते ३.३० यावेळेत घेण्यात आला. हा पेपर ११६९३ विद्यार्थ्यांनी सोडविला.
गैरहजर विद्यार्थ्यांची स्थिती (पहिला पेपर)
तालुका : चौथी : सातवी
कारंजा : १५ : १४
हिंगणघाट : ५७ : ४०
वर्धा : ६४ : ७८
देवळी : ३० : २१
समुद्रपूर : २३ : २८
आर्वी : ३१ : २१
सेलू : ५१ : २६
आष्टी : २५ : ०७
गैरहजर विद्यार्थ्यांची स्थिती (दुसरा पेपर)
तालुका : चौथी : सातवी
कारंजा : १८ : १४
हिंगणघाट : ५९ : ४०
वर्धा : ६६ : ७९
देवळी : ३२ : २१
समुद्रपूर : २३ : २८
आर्वी : ३१ : २१
सेलू : ५१ : २६
आष्टी : २५ : ०७