मधुबन लेआउट येथे उन्हाळी संस्कार वर्गाचा शुभारंभ

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Summer Values ​​Workshop महालक्ष्मी मंदिर व लोककल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मधुबन लेआउट, मनीष नगर परिसरातील बालगोपाळांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले असून, या वर्गाचा शुभारंभ रविवारी उत्साहात पार पडला.हा संस्कार वर्ग दि. २६ एप्रिल ते १० मे दरम्यान, दररोज सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
 
aasa
 
 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आकाशवाणीच्या नैमित्तिक उद्घोषिका व राष्ट्रसेविका समितीच्या जयप्रकाश मंडळाच्या शारीरिक प्रमुख पूर्वा कुलकर्णी उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी नेत्ररोगतज्ञ डॉ. श्यामजी अंधारे होते.पूर्वा कुलकर्णी यांनी मुलांना संस्कार वर्गाचे महत्त्व कथांच्या माध्यमातून समजावून सांगितले. Summer Values ​​Workshop डॉ. अंधारे यांनी डोळ्यांची काळजी, मोबाईलपासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच निरोगी डोळ्यांसाठी योग्य आहार याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी आलोणी यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय रागिणी नगरकर यांनी करून दिला. आभार प्रदर्शन कल्याणी पिदडी यांनी केले. प्रार्थना व गीत सादरीकरण सरिता शर्मा व हिरण्या देशकर यांनी केले तसेच मुलांना श्लोक शिकवण्यात आले.यावेळी संस्कार वर्गाचे मार्गदर्शक शरदचंद्र लांबे व मंदिराच्या कोषाध्यक्ष आसावरी कोठीवान उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता मुलांना अल्पोपहार देऊन करण्यात आली.
सौजन्य:आसावरी कोठीवान,संपर्क मित्र