दोन ट्रेलरच्या धडकेत एक ठार

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
- कोहमारा येथे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

सडक अर्जुनी, 
Trailer apghat तालुक्यातील कोहमारा परिसरात मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रेलर एकमेकांवर आदळले. या भीषण अपघातात अडकलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २६ एप्रिलच्या रात्रदरम्यानची आहे. अपघात एवढा जोरदार होता की, दोन्ही ट्रेलरचा समोरील भाग चेंदामेदा झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
 
 
apghat dksl
 
Trailer apghat  सविस्तर असे की, ट्रेलर क्र.जीजे-०३/बीवाय-७७१८ चालक नागपूरहून रायपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान कोहमारा शिवारात मागून येणार्‍या ट्रेलर क्रमांक सीजी-०७/डीडी-८८४१ ने मागून जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती मागच्या ट्रेलरचे केबिन पूर्णपणे चेंदामेंदा झाले. आणि चालक स्टिअरिंगमध्ये अक्षरशः अडकून पडला. अपघाताची माहिती मिळताच कोहमारा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य सुरू केले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर चालकाला केबिनमधून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच गुन्हा नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविले. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून प्रकरणाचा पुढील तपास डुग्गीपार पोलिस करीत आहेत.