२४ बाय ७ योजना राबविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
चोवीस बाय सात वॉटर सप्लाय इंजीनियरिंग या पुस्तकाचे प्रकाशन
 
नागपूर 
Twenty-four-seven water supply नागपुरात २४ बाय पाणी पुरवठा हा प्रकल्प राबविण्यात आला.मात्र काही त्रृटया असल्यामुळे ही योजना यशस्वी करता आली नाही. मुख्यत: चोवीस बाय सात योजना नियोजनबध्द पध्दतीने राबविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 

nitin-gadkari 
 
इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन नागपूर शाखेतर्फे हॉटेल सेंटर रामदासपेठ येथे २४ बाय ७ वॉटर सप्लाय इंजीनियरिंग या डॉ. संजय दहसहस्र यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी इंडियन वॉटर वर्क्सच्या राष्ट्रीय अध्यक्ष मनीषा पलांडे, कमोलिका गुप्ता, डॉ. ओ.एन. मुखर्जी, डॉ. ईशा खेडीकर उपस्थित होते.
एकाच मार्गावर वारंवार खोदकाम
नितीन गडकरी पुढे म्हणाले, एकीकडे शहरात नवनवीन कामे होत असताना खोदकाम सुध्दा मोठया प्रमाणात होत आहे. एखादे काम पूर्ण होताच अन्य एखाद्या कंपण्यांकडून पुन्हा त्याच मार्गावर वारंवार खोदकाम होत असल्याने नागरिकांकडून अनेक प्रकारच्या तक्रारी येतात.
परफॉर्मन्स ऑडिट हे महत्त्वाचे
Twenty-four-seven water supply  पाणी व्यवस्थापन असो किंवा अन्य कुठल्याही प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समितीद्वारे प्रकल्पाच्या टप्प्यांची सर्व स्तरावर व्हावी. तसेच वास्तुविशारदाद्वारे उत्तम प्रकल्प संरचना त्याचप्रमाणे खाजगी सहकारी सहभाग आणि अधिकार्‍यांचे परफॉर्मन्स ऑडिट हे महत्त्वाचे ठरत असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. प्रकल्प व्यवस्थापन समिती ही प्रकल्पाच्या सुरुवातीपासून तर समाप्तीपर्यंतच्या सर्व प्रक्रियाबाबत जबाबदार असली पाहिजे. विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) हा कुठलीही निविदा काढण्यापूर्वी व्यवस्थित अभ्यास करण्याचे आवाहन बांधकाम तसेच क्षेत्रातील अधिकार्‍यांना केले.