वाशीम,
Vishwamangalya Sabha Washim विश्वमांगल्य सभा वाशीम शाखेच्या वतीने बालसभा आयाम अंतर्गत मालेगाव येथे दहा दिवसीय ग्रिष्मकालीन शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये श्रीलेखा पातुरकर यांनी महिषासुर मर्दिनी स्तोत्र व प्रज्ञा विवर्धन स्तोत्र, तर जयश्री मुरलीधर यांनी गणपति स्तोत्र शिकविले. संत सावता माळी व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रशिक्षक केशव इंगोले, प्रवीण राऊत, प्रिया जोगदंड, मुक्ता इंगोले, जयश्री इंगोले यांनी लाठीकाठी व स्वसंरक्षणाचे धडे दिले.
Vishwamangalya Sabha Washim सारिका ढेंगळे यांनी योगासने घेतली. रेणुका लटूरिया यांनी विविध खेळाचे कौशल्य शिकविले. यावेळी डॉ. अर्चना मेहकरकर यांनी विश्वमांगल्य सभेची माहिती दिली. कार्यक्रमाच्या समारोपामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरविश्यात आले. मुलांना संस्कार, शिस्त व उज्ज्वल व्यक्तिमत्त्व विकासासाठी ही बालसभा अत्यंत उपयुक्त ठरली. या बालसभेला विभाग संघटन मंत्री संगराताई चुंबळकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रुता गडेकर, अर्चना घुनागे, अंजली मादस्वार यांनी परिश्रम घेतले.