तळेगाव (श्या.पं.),
Water supply stopped आष्टी तालुयातील थार येथील पाण्याच्या टाकीजवळ जमिनीत गाडलेल्या जलवाहिनी तोडण्यात आल्याने थार गावाचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. आष्टी ते कारंजा (घा.) सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणार्या कंत्राटदाराच्या कामगारांनी जेसीबीच्या सहाय्याने नालीचे खोदकाम करताना जलवाहिनी तोडली. त्यामुळे थार गावाचा पाणी पुरवठा ठप्प झाला असून गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
Water supply stopped आष्टी तालुयातील थार, बोरखेडी, बाम्बर्डा, चामला या गावांना उन्हाळ्यात जलसंकटाला तोंड द्यावे लागते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जलजीवन मिशन योजनेतून कोट्यवधीचा निधीचा खर्च करून पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले. नवीन जलवाहिनी थार गावाची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी उपयुत ठरणारी आहे. पण, आष्टी-कारंजा रस्त्याचे बांधकाम करणार्या कंत्राटदारांच्या कामगारांनी परवानगी न घेता नालीसाठी केलेल्या खोदकामात केले. बोरखेडी गावातही असाच प्रकार करण्यात आला.