वर्धा,
Women's reservation महिला सशतीकरणासाठी बुलंद महिला आरक्षण विधेयकाच्या पृष्ठभूमीवर वर्धेत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने शनिवार २५ रोजी सायंकाळी झॉशी राणी चौकात काँग्रेसच्या भूमिके विरोधात निषेध करण्यात आला. त्यानंतर महादेव मंदिरात आयोजित जाहीर सभेत काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचे लत्करं काढण्यात आले. शहरातील झाँशी राणी चौक येथे राणी लक्ष्मीबाईच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पदयात्रा महादेव मंदिर महादेवपुरा या मार्गाने काढण्यात आली. या मोर्चामध्ये शेकडो महिलांनी समान हक द्या, नारीशतीला न्याय मिळालाच पाहिजे, महिला सशतीकरण हाच खरा विकास, अशा घोषणा दिल्या.
महिला संमेलनाला माजी खासदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली येरावार व हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी मार्गदर्शन केले. महिलांना राजकीय प्रक्रियेत समान सहभाग मिळाल्याशिवाय खरी लोकशाही मजबूत होऊ शकत नाही, असे मत व्यत केले. यावेळी काँग्रेसवर टीका करत, इतया महत्त्वाच्या विषयावर राजकारण करून महिलांच्या आशा-अपेक्षांशी खेळ केला जात आहे. महिलांना केवळ आश्वासन नव्हे, तर ठोस निर्णयाची गरज आहे. महिला आरक्षण विधेयक हे महिलांच्या सशतीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल असून त्याला संपूर्ण समर्थन मिळणे आवश्यक आहे. आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करत आहेत.
Women's reservation शिक्षण, उद्योग, प्रशासन, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, निर्णय प्रक्रियेत त्यांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आरक्षणासारखी प्रभावी यंत्रणा आवश्यक आहे. हे केवळ महिलांच्या हकांचे संरक्षण नाही तर देशाच्या सर्वांगीण विकासासाठीही अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यत करण्यात आले. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन पार पडले. दरम्यान, महिलांच्या हकांसाठी आणि त्यांच्या सशतीकरणासाठी पुढेही अशाच तीव्र व संघटित आंदोलनांची मालिका सुरू ठेवण्याचा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आला.