दिग्रस न्यायालयात आरोपीला हजर
कठोर कारवाई करण्याची भाजपाची मागणी
दिग्रस,
Arrests for harassing women महिलांची छेड काढणारा व ज्याच्यावर 10 हजार रुपयांचे बक्षीस असलेला भामटा रविवार, 26 एप्रिलला पोलिसांच्या हाती लागल्याने चांगलीच खळबळ उडाली. त्याला समज देऊन सोडवण्यासाठी पोलिसांना भेटणाèया महाभागांविरुद्ध चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील दिवाणनगरातील मुहंमद नियाजी मुहंमद ईब्राहिम असे त्या विकृत भामट्याचे नाव आहे. मागील दोन महिन्यांपासून तो काळ्या रंगाच्या दुचाकीवर येऊन, नंबर प्लेटवर काळ्या रंगाचे स्टिकर लावून, तोंडाला गमछा बांधून शहरातील बंग लेआऊट, भास्करवार लेआऊट, व्यंकटेश नगरी, पाटीलनगर या भागात रात्री महिलांना मागून येऊन धक्का द्यायचा, त्यांना ‘बॅड टच’ करून दुचाकी घेऊन पळन जायचा.
Arrests for harassing women या प्रकारामुळे परिसरातील महिला भयभित झाल्या होत्या. या बाबत तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. तक्रारीचे गांभार्य लक्षात घेवुन परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी डॉ. तेजस सारडा यांनी तिन पथके तयार करून त्या विकृत आरोपीचा वेळोवेळी शोध घेतला. मात्र तो हुलकावणी देत असल्याने त्याच्याबाबत गोपनीय माहिती देणाèयास 10 हजार रुपयांचे नगदी बक्षीस जाहीर केले होते. एका महिलेच्या तक्रारीवरुन मुहंमद नियाजी मुहंमद ईब्राहिमविरुद्ध कलम 74, 75(2), 78(2), 79 भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात दिग्रस प्रभारी अधिकारी डॉ. तेजस सारडा व पथकाने ही कारवाई केली.
त्या भामट्याविरुद्ध कठोर कारवाई करा
मुहंमद नियाजी मुहंमद ईब्राहिम या भामट्यासोबत यात कोणकोण सहभागी आहेत, एवढा मोठा व विचित्र गुन्हा करणाèयांना कोण पाठबळ देतो, याचाही शोध घेण्यासाठी भाजपा महिला शहराध्यक्ष जागृती मेहता यांनी पोलिस ठाण्याचा पदभार असलेले सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांची भेट घेऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली.