बुलढाण्याचा पारा ४३ अंशावर

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
Buldhana is at 43 degrees थंड हवेसाठी ओळख असलेल्या बुलढाण्याने यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेचा तीव्र फटका अनुभवला असून ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील सर्वाधिक तापमानाच्या तुलनेत बुलढाण्याचे तापमान थोडे कमी असले तरी उष्णतेची तीव्रता अधिक होती. दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे ठिकठिकाणी शितपेयाचे दुकाने रसवंती तसेच टोपी, चष्मे सर्वसामान्याचा माठ विक्रीचे दुकाने थाटली आहे.
 
 
bul
 
Buldhana is at 43 degrees  थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा शहरात एवढ्या उच्च तापमानाची नोंद चिंताजनक मानली जात आहे. गेल्या काही वर्षात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र असून हवामान बदल, वेगाने वाढणारे शहरीकरण वृक्षकटाई ही प्रमुख कारणे पुढे येत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत शेतकरी, बांधकाम मजूर आणि रस्त्यावर काम करणार्‍या कामगारांना या उन्हाचा सर्वाधिक फटका बसत आहे. उष्माघाताच्या घटनांची शयता लक्षात घेता आरोग्य विभागानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे.