पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

प्रेमसंबंधातून केला मानसिक छळ

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
नागपूर,
crime-of-abetting-wife-to-suicide : विवाहानंतरही शिक्षकाशी जुळलेल्या प्रेमसंबंधाची कुणकूण लागल्यानेच पत्नीने मानसिक छळ केला. इतकेच नाही संपत्तीसाठी छळणाऱ्या पत्नीच्या जाचाला कंटाळूनच तरुणाने तलावात उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले. या प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
 
 
ngp
 
 
 
इसासनी येथील शिलरत्न (४२, रा. कृष्णनिर्सग अपार्टमेन्ट) यांनी २२ एप्रिलला अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आधी अकस्मात मृत्युची नोंद करत तपास सुरू केला होता. दरम्यान शिलरत्नची पत्नी रूचिका (३२) हिचे मेश्राम नावाच्या शिक्षकाशी प्रेमसंबंध जुळल्याचे पोलिसांना आढळले. याची शिलरत्नलाही कुणकूण लागली होती. यावरून रुचिका ही त्याला तुझ्या सोबत राहायचे नाही. तु मला तुझी संपत्ती दे, पैसा दे व सोडचिट्टी दे, असा तगादा लावत होती. त्यानंतर तू आत्महत्या केली तरी मला पर्वा नाही, असे सांगत रुचिका शिलरत्नला छळत होती. पत्नीच्या या त्रासाला कंटाळुनच शिलरत्नने २२ एप्रिलला अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. प्रारंभी शिलरत्नच्या भावानेही आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. तपासासून ही बाब निष्पन्न झाल्याने पोलिसांनी पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला.