दारव्हा नप शाळा क्र.2 चे यवतमाळ जिल्ह्यातून सर्वाधिक मेरिटमध्ये
दिनांक :27-Apr-2026
Total Views |
एनएमएमएस परीक्षेत उत्तुंग भरारी
दारव्हा,
Darva Nap School No. 2 has the highest merit केंद्र शासनामार्फत दरवर्षी इयत्ता 8 वीतील आर्थिक दुर्बल घटकासाठी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता यादीत येणाèया विद्यार्थ्यांना प्रत्येकी 48 हजाराची शिष्यवृत्ती मिळत असते. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा नगर परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 2 चे सर्वाधिक 75 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. दारव्हा तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख आहे. आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने कित्येक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. अशा परिस्थितीत दारव्हातील नप उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्र.2 या शाळेने एनएमएमएस शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानाबरोबरच आर्थिक पाठबळाचा वसाच हाती घेतला आहे.
Darva Nap School No. 2 has the highest merit मुख्याध्यापक रमेश राठोड यांच्या मार्गदर्शनात वर्षभर एनएमएमएस तसेच शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध परीक्षा अशा अनेक परीक्षांचे योग्य नियोजन केले जाते. यापुर्वी एनएमएमएस परीक्षेत सत्र 2018-19 मध्ये 35 विद्यार्थी, सत्र 2019-20 मध्ये 82 विद्यार्थी, सत्र 2020-21 मध्ये 70, सत्र 2021-22 मध्ये 77, सत्र 2022-23 मध्ये 71, सत्र 2023-24 मध्ये 61, सत्र 2024-25 मध्ये 71 तर यावर्षी 75 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. यावर्षी तब्बल 219 विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत पात्र ठरले आहेत. यामधून गुणवत्ता यादीत आलेल्या 75 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 48 हजार रुपयांची शिष्यवृत्ती लागू झालेली आहे. त्यात अनुष्का सुनिल कानतोडे ही विद्यार्थिनी दारव्हा तालुक्यातील प्रथम, यवतमाळ जिल्ह्यातून द्वितीय तर विदर्भातून तृतीय आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे नप दारव्हाचे अध्यक्ष सुनील चिरडे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, शिक्षण सभापती वैशाली खाटिक, नपचे सर्व सभापती, नगरसेवक, गटशिक्षणाधिकारी क्रांती खेडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष काजल अजिंक्य निमकर, प्रशासन अधिकारी आकाश धवणे, मुख्याध्यापक रमेश राठोड व सर्व शिक्षकांनी कौतुक केले.